राज ठाकरे यांनी सांगितले की, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा झाली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची भूमिका पूर्णपणे सकारात्मक होती. त्यांनी आशा व्यक्त केली की, येत्या काही दिवसांत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबत चांगली बातमी मिळेल. त्यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.सस्नेह जय महाराष्ट्र, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा. राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026