सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जून 2024 (09:47 IST)

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

arrest
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी महिलेने आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

महिलेने सांगितले की तिचे आणि आरोपीचे प्रेम संबंध होते. आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले नंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला नंतर त्याने लग्नाला नकार दिला आणि प्रेम सम्बन्ध मोडले. 
नंतर महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि 376(2) (एन) (त्याच महिलेवर वारंवार बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांनी आरोपीला सोमवारी रात्री उशिरा अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit