1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:10 IST)

लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा

sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमपीएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. ईडीने राऊतांच्या जामिनाला विरोध केला परंतु हायकोर्टाने ईडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर १०२ दिवस आर्थर रोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मी लढतच राहणार असा निर्धार राऊतांनी जेलबाहेर येताच व्यक्त केला. राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
 
मोहित कंबोज आणि संजय राऊत यांच्यातील कोल्ड वॉर जुनं आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा उल्लेख मोहित कंबोज यांनी सलीम-जावेदची जोडी असा केला होता. राऊत बाहेर येताच कंबोज यांनी ट्विटरवर "लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा" असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यावेळी संजय पांडे यांना अटक झाली होती. तेव्हा एक संजय तुरुंगात गेला, आता दुसराही जाईल, अशा आशयाचं ट्विट कंबोज यांनी केले होते. त्यानंतर संजय राऊतांवर कारवाई झाली होती.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor