शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2023 (07:51 IST)

किनगाव परिसरात दहा रुपयांचा बंदा घेण्यास नकार

10 rs coin
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील व अन्य गावात दहा रुपयाचा बंदा अफेमुळे व्यवहारात घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे. हा दहा रुपयाचा बंदा दुकानदार घेत नाही. ना नागरिक स्वीकारत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून दहा रुपयाचा बंदा चलनात सुरू असूनही चलनात घेतला जात नाही. कुणीतरी दहा रुपयाच्या नाण्याबद्दल बंद झाला म्हणून अफवा पसरविल्यामुळे हा दहा रुपयाची नाणी मार्केटमध्ये अधिक कुणी स्वीकारत नाहीत कुणी दिले तर घेत नाहीत तर कुणाकुणी स्वीकारत नाहीत. या संदर्भात सेंट्रल बँकेचे शाखा किनगावचे उपशाखा अधिकारी. एस एन हाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा बंद बंद नसून चालू आहे व पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र हा बंद मार्केटमध्ये आहे . बँकेमध्ये हा बंदा स्वीकारतो आणि सुरू आहे. मागे आरबीआय बँकेने परिपत्रक काढले की जो कोणी हा बंदा स्वीकारत नाही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा असे त्यांनी बोलताना सांगितले.