शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (09:47 IST)

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 26,924 नवमतदारांची नोंदणी

election commission
लातूर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 22 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 ते 19वर्षे वयोगटातील 26 हजार 924 नवमतदारांची नोंदणी झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबरला जिल्ह्यात प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्या नंतर नवमतदारांची नोंदणी तसेच मयत व दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरूस्ती अशा कामांसाठी 9 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जावर 26 डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात आली मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांमध्ये ही मुदत आता 12 जानेवारी केली आहे तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.

या दरम्यान दुबार नावे तसेच मयतांची नावे वगळणे हे काम प्रामुख्याने करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना देण्यात आले आहेत. त्या सोबतच नवमतदारांनाही नोंदणीसाठी संधी देण्यात येणार आहे त्यामुळे अंतिम मतदार यादी आता 5 जानेवारीऐवजी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 22 जानेवारीनंतरही मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे तरी अद्याप नाव न नोंदविलेल्या पात्र व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor