सिनेमा गृहात जोडप्यांना 200 रुपये प्रति तास प्रमाणे कॉर्नर सीट रोमान्स
धुळे जिल्ह्यातील ही घटना आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सिनेमासाठी नेहमी जातात, मात्र धुळ्यात सिनेमा पाहणे सोडून सिनेमागृहात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी पकडले आहे. या जोडप्यांकडून सिनेमागृहात अश्लील चाळे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून सिनेमागृहात प्रवेश केला आणि 10 युवक, युवतींना ताब्यात घेतलं, तर काही जण फरार झाले.
धुळ्यातील ज्योती सिनेमागृहातील हा प्रकार असून, या थिएटरमध्ये जोडप्यांना 200 रुपये प्रति तास या प्रमाणे विशेष बॉक्सची सोय करण्कयात आली होती. या जागेवर जोडपी अश्लील चाळे करयाचे . मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. याची माहिती दामिनी पथकाला मिळाली आणि मग सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दलातील एक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्याने बनावट जोडपं म्हणून थिएटरमध्ये गेले होते. माहितीची खातरजमा करताना या जोडप्यांकडून अश्लील चाळे केले जात असल्याचं पोलिसांच्या दिसले. त्या नुसार कारवाई केली कूण आठ जोडपे म्हणजे आठ तरुणी आणि आठ तरुण होते. यापैकी सहा जण पळून गेले, तर 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.