शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:21 IST)

राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला

राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांची घट झाली आहे. 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे.

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिमपाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्ये लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे. राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटलं असलं तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्क्यांनी वाढला आहे. भंडारा पाठोपाठ परभणी आणि लातूरमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.