गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (08:12 IST)

मुंबईतल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

blood donation
मुंबईमध्ये आणि आसपासच्या उपनगरांमध्ये दिवाळीच्या सुट्यांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच हा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रूग्णांमध्ये आणि रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा शोध घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ब्लडबँकांनी त्यांच्याकडे मोजक्याच ब्लड ग्रुप्सचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. रक्ताच्या या तुटवड्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. वृत्तनुसार दिवाळीमुळे मर्यादित स्वरूपात रक्तदान मोहिम राबवण्यात आली होती. त्यामुळे, शहरात आणि आसपासच्या भागांमधील रक्तपढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.
 
ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर
रविवारी, बीवायएल नायर रुग्णालय वगळता अनेक ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर आला होता. शिवाय, रक्तसाठा उपलब्ध आहे का? अशी विचारणा डॉक्टर आणि रक्तपेढीचे कर्मचारी यांच्यामध्ये सुरू होती. परिणामी, या रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor