रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2023 (22:19 IST)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘क’वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

chandrakant patil
पुणे : गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. आता ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठी ४.५० कोटी, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३.१० कोटी निधी देण्यात आला आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
 
राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.