शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (21:41 IST)

पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागलेले, भुजबळ यांचा खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवला येथे विकास कामांचा पाहणी दौरा करत होते. यावेळी भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. भाजपला देशातील पाच राज्यांतील निवडणुकीमध्ये चांगले यश मिळणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असल्याचे भुजबळाना सांगितले. यावर भुजबळ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी भविष्यवाणी सांगयला सुरुवात केली आहे. मी त्यांना विचारले जोशी बुवा भविष्य पाहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? असा टोला चंद्रकांत पाटलांना भुजबळांनी लगावला आहे.
 
दरम्यान मी भाजीवाला आहे. भविष्यकार आहे का? परंतु केंद्रीय यंत्रणांचा वापर करणाऱ्या भाजपला थांबवण्यासाठी लोकशाही मानणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
 
सोमय्यांची तब्येत बिघडू नये म्हणून पोलिसांकडून नोटीस
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सोमय्या यांनी भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली आहे. सोमय्यांनी मालमत्तेची पाहणी केल्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भुजबळ म्हणाले की, सांताक्रूझ येथील बंगल्याची सोमय्यांनी लोकांची गर्दी करुन पाहणी केली. त्यांची तब्येत बिघडू नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.