suvichar
✕

… म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार

Updated: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (21:29 IST)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे 2022 पर्यंत सर्वांना घरं मिळावे हे स्वप्न आहे.मुख्यमंत्र्यांनी येथील आदिवासी बांधवांसह येथिल अतिक्रमण बाधीतांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी आभार मानले आहेत.
 
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये केलेल्या सुधारित झोपडपट्टी कायद्याची अंमलबजावणी करावी आणि पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टी वासीयांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला.तसेच प्रशासनासोबत बैठका घेतल्या. या सर्वाचा परिणाम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी  काल झालेल्या बैठकित आदिवासींच्या पुनर्वसनासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले, असे शेट्टी यांनी सांगितले.
 
समितीवर निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करावी
एआरएचे काम गतीने होण्यासाठी आणि गरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समतीमध्ये भ्रष्ट प्रशासकीय अधिकऱ्यांचा (Corrupt administrative officer) समावेश करु नये. या समितीवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आणि निवृत्त न्यायमूर्तींची (retired Justices) नेमणूक करावी.जेणेकरुन गरिबांना योग्य न्याय मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

MPSC पेपर लीक प्रकरणात अभिजीत दीपके विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानात; आंदोलनाचा इशारा

पुण्यात नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ; ‘मंगल दोष’ दूर करण्याच्या नावाखाली अघोरी विधी करण्यास भाग पाडल्याचा आरोप

दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल; आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती तपासाच्या रडारवर!

ई20 पासून NTA पर्यंत; शास्त्रज्ञांची महाराष्ट्र सरकारकडे ‘या’ तीन मोठ्या बदलांची मागणी

पुढील लेख
Show comments