1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 27 एप्रिल 2022 (21:32 IST)

राणा दाम्पत्यावर बोलताना कॉंग्रेस नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली

vijay vadettiwar
सध्या महाराष्ट्र मध्ये भोंगे प्रकरण आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून वादंग निर्माण झालेला आहे. यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्येमोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी झाली. मात्र यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. तसेच राणा दाम्पत्यावर बोलताना कॉंग्रेस नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली आहे.
 
यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार  म्हणाले की, राणा दाम्पत्यांनी विनाकारण आतंक माजवला आहे. त्यांनी मुंबई आणि दिल्लीला वेठीस धरले आहे. हे सर्व करण्यामागे यांचा काय हेतू आहे समजत नाही. यांनी मुंबईला अशांत केले आहे. त्याच मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राना दाम्पत्यांना हारामखोर नीच हलकट अशा शिव्या देखील स्टेजवरून मंत्री विजय वडेट्टीवार दिल्या आहेत.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे शिबिर आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भोंगे प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टारगेट केले. घरोघरी हनुमान चालिसा वाचली जाते, हिंदू धर्मात लग्नाआधी हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं आणि आम्हाला सांगत आहेत की, हनुमान चालिसा वाचावी, ज्याने त्याने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. .राज ठाकरे यांनी झेंडे बदलले असाही आरोप त्यांच्यावर केला आहे. तर भोग्याच् समर्थन देखील केलं.