शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:28 IST)

५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे

राज्यातील ५० तालुक्यांमध्ये पाऊसच झाला नाही तरीही सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी तयार नाही. अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे मात्र मुख्यमंत्री म्हणतात राज्यात दुष्काळ नाही. सरकार इतके असंवेदनशील आहे की यांना जनतेची काहीच चिंता जाणवत नाही अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केली. आसोदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
 
सुप्रिया सुळे यांनी पुढे एकंदरीतच सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. सरकार पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबाबत अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत आहे. रुपया मोठ्या प्रमाणावर घसरला आहे अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, डॉक्टर्स, वकील असे सगळेच घटक या सरकारच्या कार्यकाळात नाराज आहेत. बहुमताच्या जोरावर बदल घडवून आणण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे असेही त्या म्हणाल्या.