1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (14:32 IST)

दहावीत सर्व विषयांमध्ये 35 गुण

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मात्र हा निकाल गेल्या 4 वर्षांपेक्षा सर्वात निचांकी असल्याचे समोर आले असून 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. तर केवळ उत्तीर्ण झाले आहेत. मात्र यात चर्चेत आहे तो म्हणजे ठाण्यातील एक मुलगा ज्याला सर्वच विषयात 35 गुण मिळाले आहे. तो अगदी काठावर पास झाला आहे.
 
ठाण्याच्या उथळसर भागात राहणाऱ्या विशाल अशोक कराड या विद्यार्थ्याने सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवले यामुळे सध्या सर्वत्र याची चर्चा रंगली आहे. मात्र काठावर पास झाला तरी विशालचे त्यांच्या आई वडिलांनीही कौतुक केले आहे. 
 
तर विशालला 40 टक्क्यांची अपेक्षा होती पण जे काही गुण मिळाले त्यात तो समाधानी असल्याचे सांगत आहे. त्याने निकाल लागल्यावर सर्वात आधी पास झाला की नाही हे तपासले. विशालची घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याला मॅकेनिकल इंजिनिअर व्हायचे आहे.