शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (10:21 IST)

मनसेने तोडले कुलूप, केला मंदिरात प्रवेश

कोरोनाच्या संकटाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदिरांच्या भरवश्यावर असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असल्याने बंद असलेली मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर येथील काही पुजाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मंदिरे उघडण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. यावेळी योग्य नियमावली तयार करून मंदिरे उघण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली होती.
 
याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले होते. मात्र त्यांच्या मागणीची दखल राज्य सरकारने आद्यपही घेतलेली नाही. यासर्व पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी संताप व्यक्त करत नवी मुंबईच्या पनवेल येथील निरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडत महाआरती केली. राज साहेबांनी मंदिरे उघडण्याबाबत दिलेली मुदत संपली आहे. आता आम्हीच मंदिरे उघडू .राज साहेबांनी दिलेली मुदत संपली, आता महाआरतीसुरू अश्या घोषणाही मनसैनिकांनी दिल्या. दरम्यान, पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.