शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (15:19 IST)

कोकण विभागाची बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल

Maharashtra HSC RESULT
महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुंबई विभाग सर्वात मागे राहिला तर कोकण विभागाने बाजी मारली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल  08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार आहे.
 
राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे.
 
पाह विभागानुसार निकाल
 
पुणे- 93.61%
 
नागपूर- 96.52%
 
औरंगाबाद- 94.97%
 
मुंबई- 90.91%
 
कोल्हापूर - 95.07%
 
अमरावती - 96.34 %
 
नाशिक - 95.03%
 
लातूर- 95.25%
 
कोकण - 97.21%
 
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी आघाडी घेतली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली तर 93.29 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.