बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:36 IST)

समीर वानखेडे प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक- किरीट सोमय्यांचा आरोप

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रिक असून अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरू होत्या, त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
 
'एका अधिकाऱ्याची जात काढली जात आहे, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते याची लाज वाटायला हवी,' अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी टीका केली आहे.
 
अजित पवारांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू करण्यात आलं असून लक्ष विचलित करण्यात येत असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.