रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (10:15 IST)

आजपासून वाजणार शाळांची घंटा

school
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उन्हाळ्याच्या सुटीनं तर शाळा पुन्हा सुरू होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून म्हणजेच 15 जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांच्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत. 
 
आजपासून शाळा पुन्हा जोमाने सुरु झाल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं  जंगी स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुलं देत, त्यांचं स्वागत करण्यात आलं. पहिल्या दिवशी मुलांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी दहा ते सव्वापाच वाजेपर्यंत असणार आहे. तर अनुदानित व खासगी काही शाळांची वेळ दुपारी बारा ते
साडेपाचपर्यंत आहे.