रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (09:27 IST)

कट प्रॅक्टिसविरोधात राज्य सरकार आणणार कायदा

आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाला अन्य डॉक्टरकडे पाठविल्यास संबंधित डॉक्टरला ठरावीक रक्कम मिळते. वैद्यकीय विश्वात याला 'कट प्रॅक्टिस' असे संबोधले जाते.
 
सर्रास चालणाऱ्या या कट प्रॅक्टिसवरच काट मारण्याचा निर्धार सरकारने केला असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी कट प्रॅक्टिसविरोधी कायदा आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे डॉक्टरांचे कमिशन बंद होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
रुग्णाची शिफारस करण्याच्या प्रकारात पैशांची देवाणघेवाण होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेला कट प्रॅक्टिसविरोधी कायदा देशात अस्तित्वात नाही.
 
सगळेच डॉक्टर या प्रकारांत सहभागी असतात असे नाही. पण, जे डॉक्टर ही प्रॅक्टिस करतात, त्यांच्यामुळे वैद्यकीय विश्वाची प्रतिमा मलिन होते. या पार्श्वभूमीवर कट प्रॅक्टिसविरोधी कायदा आणला जाणार आहे.
Published By -Smita Joshi