पीपीई कीट घालून ‘रेमडेसिव्हिर’ची चोरी, असा लागला छडा

crime
Last Modified सोमवार, 19 एप्रिल 2021 (07:53 IST)
नाशिक येथे गंगापूररोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात पीपीई कीट घालून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकी वरखेडे या मुख्य संशयितासह त्याला मदत करणारे रुग्णालयातील कर्मचारी ओटी मदतणीस सागर सुनिल मुटेकर आणि वॉर्ड बॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना अटक केली आहे.
गंगापूररोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गुरुजी रुग्णालयातून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी झाली. नर्सिंग काऊंटरवर औषधाच्या बॉक्समध्ये ठेवलेले राजेश विश्वकर्मा या रुग्णाचे इंजेक्शन एका व्यक्तीने पीपीई कीट घालून येत चोरुन नेले. रुग्णालय प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहानिशा केली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिस पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. वरखेडेसह मुटेकर आणि बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली. त्यात तिघांनीही गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून दोन मेरडेसिव्हिर इंजेक्शनही जप्त करण्यात आले आहेत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू,10 ...

राज्यात कोरोना विषाणूमुळे 237 रुग्णांचा मृत्यू,10 हजारापेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंदणी
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 10,107 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. बुधवारी आरोग्य ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - ...

इंदू मिलमधल्या आंबेडकर स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करा - धनंजय मुंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करावं ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- ...

कोरोना लशीमुळे शरीर चुंबक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही- डॉक्टरांनी केलं स्पष्ट
प्रवीण ठाकरे कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आलं असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ ...

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट
हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ...