मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 6 जुलै 2022 (21:05 IST)

त्यांना शिवसेना बळकवायची आहे, उद्धव ठाकरे यांचा आरोप

uddhav thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ठाकरेंनी शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आता काही काळ कसोटीचा आहे. त्यामुळे यांना शिवसेना फक्त फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्र रचलं जात आहे. आम्ही तर आता तुमच्याच माणसाला मुख्यमंत्री केलं आहे. ज्यांनी शिवसेना फोडली किंवा जे संपवायला निघालेत, त्यांना शिवसेना बळकवायची आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
 
शिवसेना बळकवून त्याचं अस्तित्व त्यांना नकोय. मात्र, आता तुम्हाला भगवा ठामपणे हातात पकडायची गरज आहे. शिवसेना ही एकच आहे. एकच होती आणि एकच राहील. ती म्हणजे आपली शिवसेना..,असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
दुसरी शिवसेना या राज्यात येऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही यांच्या भ्रमाला बळी पडू नका. कारण थोडे दिवस हे लालूच दाखवण्याचं काम करतील. मात्र, त्यांना पुरंदरचा मावळा विकला जाता कामा नये आणि शरण जाता कामा नये. त्यामुळे शिवसैनिकांनी आता जोमानं कामाला लागावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.