रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (22:24 IST)

अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा सुरु असताना राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसे दिलेला शब्द पाळला, असं शरद पवार म्हणाले.
 
शरद पवार यांनी पुण्यात होते. यावेळी  शरद पवार यांना राजू शेट्टी यांच्याबद्दल विचारण्यात आलं. ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही,” असं शरद पवार म्हणाले.
 
शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय,” असं शरद पवार म्हणाले.