गुजरातला हजार कोटीची मदत मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक का ?राष्ट्रवादी काॅग्रेसचा सवाल...

cyclone tauktae
Last Modified गुरूवार, 20 मे 2021 (18:00 IST)
दोन दिवसापुर्वीच्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यात थैमान घातले. महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे व नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा करून गुजरातलाच एक हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत केली. पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत या वादळाने झालेल्या नुकसानभरपाईबाबत कवडीची मदतच काय पण विचारपुसदेखील केली नाही. अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे याबाबत बोलताना म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी गुजरात राज्याला सढळ हस्ते १ हजार कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी ही त्यांना दिसली नाही. कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी अशी टीकाही तपासे यांनी केली आहे.


महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या कोकणचा दौरा करणार आहे. यानंतर राज्यसरकार नुकसान झालेल्या कोकणच्या जनतेला नक्कीच आधार देईल असा विश्वास असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार,औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून ...

वैष्णवी पाटीलः लाल महालात लावणी, नाराजीनंतर मागितली माफी

वैष्णवी पाटीलः लाल महालात लावणी, नाराजीनंतर मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्य लाभलेल्या लाल महालमध्ये इन्स्टाग्रॅम स्टार वैष्णवी ...

'जगातील सर्वात महागडी कार', 1105 कोटी रुपये देऊनही मालकाला ...

'जगातील सर्वात महागडी कार', 1105 कोटी रुपये देऊनही मालकाला गाडी चालवण्याची परवानगी नाही
लक्झरी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या मर्सिडीजच्या कार या महागड्या असल्या तरी आता तिची एक ...

राज्यसभेचं तिकीट कुणाला?

राज्यसभेचं तिकीट कुणाला?
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीचे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार?, याबाबत सगळ्यांनाच ...

गावस्कर कमेंट- शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलव्हर केले, ते ...

गावस्कर कमेंट- शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलव्हर केले, ते कधी करणार; चाहत्यांनी कमेंट काढण्याची मागणी केली
माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल समालोचक सुनील गावसकर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात ...