रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

रोड सेफ्टीसाठी 'थ्री इडियट्स'च्या पोस्टरची मदत

'थ्री इडियट्स' चित्रपटाचं एक पोस्टर महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी शेअर केलंय. पोस्टरमध्ये आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन हे तिघे स्कूटीवरुन बिना हेल्मेट जाताना दिसतात. पोलिसांनी या तिघांच्या फोटोसह 'जाने तुझे देंगे नही' असं लिहित सर्वांनाच रोड सेफ्टीबाबत सतर्क केलं. 
 
सोबतच काही ओळी लिहिल्या आहेत. फोटोसोबत 'दिल जो तेरा बात बात घबराये, ड्रायव्हर इडियट है, प्यार से उसको समझा ले' असं कॅप्शन दिलंय. #AalIzzNotWell असं म्हणत एका वेगळ्याच अंदाजात सर्वांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे.  महाराष्ट्र पोलिसांनी या ट्विटमध्ये आर. माधवनलाही टॅग केलंय. 
 
महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटला माधवनने उत्तर दिलंय. माधवनने ट्विटला उत्तर देताना एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो हेल्मेट घालून, गाडी चालवताना दिसतोय. हा फोटो शेअर करत माधवनने, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत असल्याचं सांगितलंय. आता माधवनच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.