1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:30 IST)

पुन्हा व्हिडिओ व्हायरल, कप्तान मलिककडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ

video viral
अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक बंधू कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कप्तान मलिक चक्क एका मराठी मुलाला मारहाण आणि आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये कप्तान मलिक फोनवर बोलणाऱ्या मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करीत आहेत. 
 
शेफाली वैद्य नामक एका युजरने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना टॅग करीत नवाब मलिक यांचे भाऊ मराठी माणसाला मारहाण आणि शिवीगाळ करीत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करीत राज्यकर्त्यांनी ही मुजोरी पहावी असंही म्हटलं आहे.