शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (17:51 IST)

खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

baby
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात डोंगरगाव येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पडून एका दीड वर्षाचा मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रियांशु मेहर असे या चिमुकल्याचे नाव आहे. प्रियांशु घरात खेळता खेळता पाण्याच्या टाकी जवळ कधी गेला हे कोणालाच कळले नाही. पाण्याच्या टाकीत पडल्यावर आजूबाजूस त्याची हाक आणि आरडा-ओरड रडणे ऐकायला कोणीच नसल्यामुळे त्याला वेळीच मदत मिळाली नाही आणि पाण्यात बुडून गुदमरून त्याचा मृत्यू झाला.  

प्रियांशु हा घरात खेळात होता आणि नजर चुकवून कधी तो पाण्याच्या टाकी जावळ गेला समजलं नाही. नंतर त्याच्या आईने शोधाशोध करायला सुरु केल्यावर तिने पाण्याच्या टाकीजवळ डोकावून पाहिल्यावर तिच्या अंगाचा थरकापच उडाला.प्रियांशु पाण्याच्या टाकीत निपचित पडून होता. हे बघता आईने हंबरडा फोडला. तिचे रडणे ऐकून शेजारचे लोक धावत आले आणि त्यांनी प्रियांशूला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
 Edited by - Priya Dixit