शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (13:29 IST)

तवंदी घाटात अपघातात दोघांचा मृत्यू, 13 जखमी

बेळगाव जिल्ह्यात निपाणी जवळ तवंदी घाटात भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून त्याने 7 वाहनांना जोरदार धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. 

हुबलीकडून कराड कडे जाणारा मालवाहतूक ट्रकच्या ट्रकचालकाचा हॉटेल व्हाईट हाऊस जवळ ट्रकवरील ताबा सुटल्याने दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीचालक संतोष माने यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर या मालवाहतूक कंटेनरने आयशर आणि इतर दोन वाहनांना जोरदार धडक दिली.

नंतर ट्रक पट्टणकोडोलीच्या दिशेने जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. या ट्रक  ने अनेक वाहनांना धडक दिल्याने एकूण 13 जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला.आयशर आणि कंटेनर चालक जखमी झाले आहे.

अपघातात झालेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे बेळगाव ते कोल्हापूरला जाणाऱ्या वाहतूकची कोंडी झाली 
Edited by - Priya Dixit