1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (19:26 IST)

कॉलेज आणि शाळांबद्दल उदय सामंत यांची मोठी घोषणा

विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण (Corona) होऊ नये यासाठी मागील दीड वर्षांपासून कॉलेज आणि शाळा (Colleges and schools closed) संपूर्णपणे बंद आहेत. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण  सुरु आहे. मात्र आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी कॉलेज सुरु  एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बारावीनंतरच्या प्रवेशाबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कालपासून अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष  लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये बोलवण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली आहे.