शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (18:30 IST)

उद्धव ठाकरेंचे पुनरागमन,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी धोक्याची घंटा

काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यंदा 400 पार असा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहे. भाजपला सर्वात मोठा धक्का यूपीत बसला आहे.या ठिकाणी भाजप 62 जागांवरून 33 जागांवर आली आहे.हे भाजपसाठी खूप मोठं नुकसान आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागांसह सरकार पुन्हा स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळाली आहे या वेळी जनतेने एनडीए महायुतीकडे लक्षच दिले नाही. भाजपची घसरण विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. 

राज्यात काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात 48 जागांपैकी 30 जागा महाविकास आघाडीने काबीज केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसेनेच्या यूटीबीला 9 जागा मिळाल्या, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळाल्या.तर भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुतीला 17 जागा मिळाल्या.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाने 21 पैकी 9 जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाने 10 पैकी 7 जागा जिंकल्या आहे. यंदा महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारले असून उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाला पाठिंबा दिला. राज्यात उद्धव ठाकरे यांचे पुनरागमन झाले असून ही परिस्थिती भाजपसाठी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
 
Edited by - Priya Dixit