1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (09:00 IST)

निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र याबाबतचा निर्णय झाला की कळवला जाईल -उद्धव ठाकरे

uddhav thackeray
मुंबईत मंगळवारी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजूनही एकत्र आहोत, असे सांगितले. तसेच त्यांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र याबाबतचा निर्णय झाला की कळवला जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहात. मग येणाऱ्या पालिका निवडणुका तुम्ही एकत्र लढवणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो आहोत. एकत्र भेटल्यानंतर जरा बरं वाटलं आहे. आम्ही कुठेही फुटलेलो नसून एकत्र आहोत. त्यामुळे पुढे काय करायचं याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला निश्चित सांगू,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.