शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (23:26 IST)

वर्षा राऊत यांची ईडी चौकशी संपली ,काय झालं ?

varsha raut
सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहे. त्यांना आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.आज शनिवारी ईडी कार्यालयात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. वर्षा राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.वर्षा राऊत यांच्या बँकेच्या खात्यातून कोट्यवधी व्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांच्या खात्यात हे पैसे नेमके कुठून आले या संदर्भात चौकशी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवीण राऊत यांनी संजय आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात तब्बल 1 कोटी 6 लाख रुपये टाकले होते त्या पैशातूनच राऊतांनी अलिबागेत जमीन खरेदी केली त्याची तपासणी ईडी करत आहे. हे पैसे कुठून आले ? कसे आले याची माहिती वर्षा राऊतांकडून घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलिबाग जमिनीसह पत्राचाळ घोटाळ्याचे अनेक व्यवहार वर्षा राऊतांच्या नावावर झाल्यामुळे या प्रकरणात त्यांच्या खात्यात हे पैसे कुठून आले याची चौकशी आणि पडताळणी ईडी करत आहे.