मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (14:12 IST)

Weather update : तेज चक्रीवादळाचा धोका,आज अधिक सक्रिय होणार

मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे तेज चक्रीवादळ पुढील 24 तासांत अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली असून काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

या चक्रीवादळाला 'तेज' नाव दिले असून रविवार दुपार नंतर हे अधिक तीव्र होऊन सक्रिय होईल. तेज चक्रीय वादळ सक्रिय झाल्यावर दक्षिण पश्चिम अरबी समुद्रावर 125 -135 किमी प्रतितासाने वादळी वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. काही राज्य केरळ, तामिळनाडू, मध्ये ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि लडाख, पुडुचेरी मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तेज चक्रीवादळ अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्यामुळे  आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलाने दिला आहे. भारतीय तटरक्षक दलाने आंध्र, चैन्नई, तामिळनाडू किनारपट्टीवर जहाजे तैनात केली आहे. तसेच येत्या 25 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. 
 





Edited by - Priya Dixit