शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (10:01 IST)

Weather : राज्यातील या भागात पावसासह गारपीटीचा इशारा

Hail strom
सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. देशातील काही भागात वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली.

हवामान खात्यानं मराठवाडा, विदर्भ भागात जोरदार पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात जोरदार वार, विजांचा कडकडाटासह पावसांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट आणि कच्छ भागात चक्राकार वाऱ्याचा कमी हवेचा पट्टा सक्रिय आहे. तर उत्तर मध्यप्रदेश आणि इतर भागात चक्राकार वारे वाहत आहे. 

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या मुळे या भागात कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 हवामान खात्यानं विदर्भ क्षेत्र बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता सह ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात परभणी, जालना, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा पावसासह यलो अलर्ट दिला आहे. 
तर कोकण, मध्यमहाराष्ट्र विदर्भ, मराठवाडयात जोरदार वाऱ्यांसह विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  
 
Edited by - Priya Dixit