रिलेशनशिप टिप्स : जोडीदार खोटे बोलत आहे असे जाणून घ्या
आजच्या काळात कदाचितच असा एखादा व्यक्ति असेल जो प्रत्येक गोष्ट खर बोलतो. कधी कोणाच्या चांगल्यासाठी तर कधी वाद होण्यापासून वाचण्यासाठी लोक नेहमी खोट्याचा आधार घेतात. जर कोणाच्या चांगल्यासाठी खोटे बोलले गेले असेल तर त्यात काही वाईट नसते पण समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा नाते टिकवण्यासाठी सारख खोटे बोलले जात असेल. जास्त खोट बोलल्याने नाते तुटण्याची दाट शक्यता असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलत असेल तर तुम्ही त्यांच्या काही हावभाव वरून त्यांचे खोटे बोलणे माहित करून घेऊ शकता.
ओठ चावणे-
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रश्न विचारत असाल तर आणि तो वारंवार त्याचे ओठ चावत असेल तर समजावं की तो खोट बोलत आहे.
चेहऱ्याचा रंग बदलतो-
नेहमी जर व्यक्ति खोट बोलत असेल तर त्याच्या चेहऱ्याचे रंग बदलतात. तुमचा जोडीदार जर वारंवार खोट बोलत असेल तर त्याचा चेहरा पांढरा पडेल किंवा चेहरा आत्मग्लानिने लाल होईल अशा परिस्थितीत तुम्ही महित करून घेउ शकता की समोरची व्यक्ति खर बोलत आहे की खोट.
आवाजात बदल होणे-
कोणत्याही प्रश्नांची उत्तर देतांना तुमच्या जोडीदारचा आवाजात बदल होत असेल तर तो खोट बोलत आहे. असे समजावं. खोट बोलतांना लोकांचा आवाज जास्त करून लटपटतो.
नजर मिळवत नाही-
प्रत्येकजण आपल्या जोडीदारशी बोलतांना नजरेला नजर देवून बोलतो. आणि जर तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलतांना नजरेला नजर देत नसेल तर समजून जावे की तो तुमच्याशी खोटे बोलत आहे.