1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (05:38 IST)

Wedding Anniversary Wishes In Marathi लग्नवाढदिवसाच्या खास शुभेच्छा

तुमची जोडी राहो आनंदी अशीच
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देव करो असीच येत राहो तुमच्या जीवनात बहार
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावे तुमचे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण एखादा खास 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर असंच कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
रेशीम गाठीत अलगद बांधलेली
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
Made for each other
आहे तुमची cute शी जोडी
तुम्हाला दोघांना जीवनात
खूप प्रेम आणि आनंद मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा