गुरुप्रतिपदा विशेष दत्तगुरुंना गुळ नारळाच्या लाडूचा दाखवा नैवेद्य
साहित्य-
एक कच्चा नारळ
100 गूळ
काजू
बदाम
अक्रोड
मनुका
तूप
कृती-
सर्वात आधी नारळ घेऊन तो सोलून घ्यावा. त्यानंतर नारळाचे तुकडे करून ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या.आता गॅस वर पॅन ठेऊन त्यात तूप घालावे. तसेच सर्व सुके मेवे सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. त्याच पॅनमध्ये किसलेले नारळ सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या आणि दुसऱ्या भांड्यात ठेवा. भाजलेले सुके मेवे ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या. आता त्या पॅनमध्ये गूळ आणि अर्धा कप पाणी घालावे.आता मंद आचेवर गूळ वितळवा. गूळ पूर्णपणे वितळला की त्यात भाजलेले नारळ आणि सुके मेवे घाला आणि चांगले मिसळा. सर्व साहित्य चांगले मिसळल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हातात घ्या आणि त्यातून लाडू बनवा. लाडू बनवल्यानंतर त्यांना नारळाच्या पावडरमध्ये भिजवून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. तर चला तयार आहे आपले गुळ नारळाचे लाडू रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik