रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2024 (16:49 IST)

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

नाती जन्मोजन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेमभरल्या 
रेशीमगाठीत बांधलेली
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण… 
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
हे बंध रेशमाचे
एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, 
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुम्हाला भरभरून मिळू दे
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा
 
हळदीचा वास आणि मेंदीचा रंग
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे
तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे
वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा
 
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा