हॅपी बर्थ डे सचिन
तमाम क्रिकेटचाहत्यांचा ‘देव’ असलेला सचिन तेंडुलकरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. आयपीएच्या धामधुमीत तो आपला वाढदिवस कोठे साजरा करणार याचीउत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
आज सकाळपासूनच सोशलमिडीयावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकशहरांमध्ये त्यांच्या चाहत्यांनी भन्नाट शक्कल लढवून त्याच्या वाढदिवसाची तयारी केली आहे. सचिनने मात्र, नेहमीप्रमाणे प्रसिद्धी आणि गाजावाजा न करता आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करण्याचा मनोदय केला आहे.