रविवार, 21 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृ पक्ष: राशीनुसार पितृदोष दूर करण्याचे उपाय

मेष 
पितृदोषापासून मुक्तीसाठी पूजा स्थळी श्री हनुमान यंत्राची स्थापना करायला हवी व तंत्रोक्त हनुमान साधना करायला हवी. यासाठी कल्याणकारी मंत्र –
।।ॐ घण्टाकर्णों  महावीर  सर्व उपद्रव नाशन कुरु कुरु स्वाहा।।
 
वृषभ
आपल्या द्वितीयेला निवास स्थळी पितृयज्ञ करायला हवं आणि या दरम्यान चूल, चक्की, झाडू, खल आणि पाठी ठेवत असलेल्या जागेवर जीव हत्या होता कामा नये.
 
मिथुन
या राशीच्या जातकांनी पितृ दोष समाप्तीसाठी तृतीयेला तर्पण करावे.
 
कर्क
आपल्याला पितृपक्षात दररोज शांती स्तोत्र पाठ करायला हवा. यात २७ श्लोक आहे ज्यातून २२, २३, आणि २४ वा श्लोकाचे पाठ तीनदा करावे. पितृ बीसा पाठ केल्याने देखील या दोषापासून मुक्ती मिळेल.
 
सिंह
कुंडलीत पितृ दोष असल्यास शाबर मंत्राचा जप करावा. पितृपक्षात दररोज हा जप करता येईल.
 
कन्या
पितृ शांतीसाठी आपल्याला अद्भुत चमत्कारी श्रीमद्भागवत गीता मधील ११ व्या अध्यायाचा पाठ केला पाहिजे. पाठ करण्यापूर्वी लाकडाच्या पट्टीवर पांढरा कापड पसरवून त्यावर तुपाचा दिवा लावावा.
 
तूळ
या जातकांनी पितृपक्षात दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. याने पितृदोषाचा दुष्प्रभाव दूर होईल.
 
वृश्चिक
पितृदोष दूर करण्यासाठी विशिष्ट प्रकारे हनुमान बाहुक याचा ३२वा, ३३वा व ३८वा पद नियमित रूपाने वाचायला हवा.
 
धनू
पितृ दोष निरसन आपल्याला कुंडलीत तेव्हाच होईल जेव्हा आपण हनुमान बाहुक घनाक्षरीचा उपयोग पितृपक्षात कायदेशीर कराल.
 
मकर
कुंडलीत पितृ दोष असल्यास सव्वा मीटर पांढर्‍या कपड्याच्या कोपर्‍यात दोन रुपयाचा शिक्का आणि चिमूटभर तांदूळ ठेवावे. कपड्याच्या मधोमध नारळ ठेवून घरातील पूजा स्थळी ठेवावे आणि पितृपक्षात याची पूजा करावी.
 
कुंभ
कुंडलीत पितृदोष असल्यास घरात पितरांसाठी दररोज दिवा आणि उदबत्ती जाळायला हवी. सोबत ॐ पितृय: नम: मंत्राचा २१ वेळा जप करायला हवा.
 
मीन
कुंडलीत पितृदोष असल्यास पितृपक्षात दररोज तांब्यात पाणी घेऊन त्यात श्वेतार्क फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.