कष्ट हवे मातीला,
चला जपुया पशुधनाला..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या बैलांना आरोग्य आणि शक्ती लाभो.
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..
या पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतकरी जीवनात समृद्धी येवो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
पोळा सणाच्या पवित्रतेने आपल्या कुटुंबाला आनंद लाभो,
मनापासून शुभेच्छा!
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
बैलपुजेमुळे आपल्या शेतीला चांगला भरघोस उत्पादन मिळो,
पोळा सणाच्या शुभेच्छा!
वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
या पोळ्याच्या सणात आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येवो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
पोळा सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..
आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
बैलांच्या कष्टाला सन्मान देणाऱ्या या सणाने आपले जीवन सार्थकी लागो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
पोळा सणाच्या आनंदात आपल्या कुटुंबाला सुख लाभो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
या पवित्र सणाने आपल्या शेतीला आणि घराला समृद्धी लाभो,
पोळा सणाच्या शुभेच्छा!
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..