सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (21:33 IST)

सोनपावले नववधू ती आली

सोनपावले नववधू ती आली,
घरची ती आता गृहलक्ष्मी झाली,
सणवार तीचे करावे,खूप कौतुकाने,
उजळून निघेल घर आपले आनंदाने,
आज आहे सखी तीची मंगळागौर,
आणून पत्री, आणिलें फुलं, काढिली गौर,
वाळूचा महादेव काढून पूजिले सख्या सवे,
करून जागरण, खेळून खेळ मनोभावे,
दिधले वाण, करून आरती महादेवा आळविले,
मंगळागौरी चे हे पावन पर्व साजरे केले!
...अश्विनी थत्ते