नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी पथोली, लिहून घ्या रेसिपी
महाराष्ट्रामध्ये नागपंचमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. महिला भिंतीवर लाल चंदनाने नागदेवतांचे चित्र काढतात व याची पूजा करतात. यासोबतच पथोली आणि इतर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात. तर पथोली कशी बनावी हेच आपण आज पाहणार आहोत. तर लिहून घ्या रेसिपी.
साहित्य-
8 ते 10 हळदीची पाने-मोठी किंवा 18 ते 20 छोटी पाने
2 कप तांदळाचे पीठ
½ छोटा चमचा सेंधव मीठ
2 कप पाणी
2 कप ताजा किसलेला नारळाचा किस
2 कप गूळ पावडर
1 छोटा चमचा वेलची पूड
चिमूटभर जायफळ पूड
कृती-
तांदळाच्या पिठामध्ये, मीठ आणि पाणी घालून घोळ तयार करून घ्या. व 30 मिनिट तसेच राहू द्या.
स्टफिंग तयार करण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करून घोळ तयार करा. आता हळदीचे पाने स्वच्छ धुवून घ्यावे. पानांना हलकासा कट लावावा. पण ततपूर्वी त्याचे मागील देठ काढून घ्यावे. आता तांदळाचे पीठ पानांना लावावे. मग यामध्ये मिश्रण भरावे. आता पाने मोडून घ्यावी व आकार द्याव्या.
आता तयार पथोली वाफवून घ्यावी. गरम हळदीच्या पानांमधून कढून घ्यावी. आता गरम पथोलीचा नैवेद्य दाखवून दूध किंवा तुपासोबत सर्व्ह करावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik