रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (22:49 IST)

श्रावण 2023 : निज श्रावण म्हणजे काय, संपूर्ण माहिती जाणून घ्या

shravan
Shravan 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. या महिन्यात महादेवाची आराधना आणि श्रावण सोमवार उपवास करण्याचे महत्त्व आहे.यंदा श्रावण महिना खास असणार आहे. यंदाचा श्रावण 30 दिवसांचा नसून 59 दिवसांचा येणार आहे. या श्रावणात 8 सोमवार असणार यंदा नवीन विक्रम संवत 2080 मध्ये 12 ऐवजी13 महिने येत आहे. यंदाच्या वर्षी अधिकमास किंवा मलमास येत आहे. आपल्या हिंदू पंचांगात दर तिसऱ्या वर्षात एक महिना अधिकच असतो. याला अधिकमास किंवा मलमास असे म्हणतात. 
17  जुलै 2023 ला मध्यरात्री अमावस्या संपणार आणि  18 जुलै 2023 पासुन अधिक महिना सुरु होत आहे.तर 16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03 वाजुन 07 मिनिटांनी अधिक महिना संपुन नेहमीप्रमाणे,दरवर्षी प्रमाणे श्रावण महिना सुरु होणार आहे.
 
निज श्रावण महिना कधी पासून -
यंदा 18 जुलै ते 16 ऑगस्ट2023 अधिक मास व 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 हा श्रावण मास आहे.यंदा 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो 14 सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा अधिक मास श्रावणाचे 4 श्रावण सोमवार असतील. आणि यंदाचे निज श्रावणी सोमवार 4 असणार. म्हणजे एकूण 8 सोमवार असतील. मात्र श्रावणाचे सोमवार करणाऱ्यांनी फक्त 4 श्रावणी सोमवार करावे. या महिन्यात शंकराची पूजा आणि अभिषेक केले जाते. असं केल्याने भाविकांना शंकराचा आशीर्वाद आणि कृपा दृष्टी मिळते. भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 
 
मलमास काय आहे ?
आपल्या वैदिक पंचागात गणना सूर्य आणि चन्द्राच्या आधारे केली जाते. चंद्राचा महिना 354 दिवसाचा तर सूर्याचा महिना 365 दिवसांचा असतो. या महिन्यात 11 दिवसांचा फरक असतो. हा 3 वर्षात 33 दिवसांचा असतो दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना असतो त्याला अधिकमास किंवा मलमास , किंवा पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असं म्हणतात.  
 
अधिक मासात कोणते दान करावे -
अधिक मासात जावायाला,ब्राम्हणाला,गाईला वाण देणे,अधिक माहात्म्य वाचणे,आईची पुजा करुन आईची ओटी भरणे,देवालयांतील देवांना,गंगेला वाण देणे हे सर्व 18 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या दरम्यांन करावे तर दान देतांना अनारसे,बत्तासे,रेवड्या,मोदक,बर्फी तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात.अनारसे,बत्तासे ह्यासारख्या वस्तु 33 नग ह्या प्रमाणांत देतात.दान शक्यतो तांब्याच्या पात्रांत द्यावे.तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी.त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवुन त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी.हळद-कुंकु वाहुन वस्तुवर तुळशी पत्र ठेवावं.त्यावर रुमाल,उपरणं झाकुन त्यावर दिपदान ठेवुन तुपाची वात लावावी.दान देणार्‍या व्यक्तीचं पुजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तुवर दक्षिणा ठेवुन ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे.वस्त्रदानही देता येते.आपल्या इच्छेनुसार आपण काहीही दान करू शकता. 
आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणुन अधिक मासांत मुली आपल्या आईची साडी,खण-नाराळाने ओटी भरतात.
 
 
यंदा किती सोमवार असणार, शिवामूठ कोणती व्हावी -
यंदा पहिला श्रावणी सोमवार - 21 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी शंकराला शिवपुजनात तांदुळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. 
यंदा दुसरा श्रावणी सोमवार - 28 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी शंकराला तिळाची शिवामूठ अर्पण करावी. 
यंदा तिसरा श्रावणी सोमवार - 4 सप्टेंबर रोजी येत आहे. या दिवशी शिवपुजनात शिवामूठ म्हणून मूग अर्पण करावे. 
यंदा चवथा श्रावणी सोमवार - 11 सप्टेंबर रोजी येत आहे. तर या दिवशी शिवपुजनात शिवामूठ म्हणून जव शंकराला अर्पण करावी. 
 
श्रावण सोमवारी पूजा कशी करावी -
श्रावण सोमवारी सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
उजव्या हातात जल घेऊन श्रावण सोमवार व्रताची प्रतिज्ञा घ्यावी.
सर्व देवतांना गंगेचे जल अर्पण करावे.
ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करावा.
भोलेनाथांना पांढरी फुले, पांढरे चंदन, भांग, धतुरा, गाईचे दूध, धूप, पंचामृत, सुपारी, बेलपत्र अर्पण करा.
हे सर्व अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि चंदनाचा तिलक लावा.
श्रावण सोमवारच्या व्रताच्या दिवशी सोमवारच्या व्रताची कथा अवश्य वाचावी व शेवटी आरती करावी.
महादेवाला प्रसाद म्हणून तूप आणि साखर अर्पण करा.
 
 



Edited by - Priya Dixit