रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (06:30 IST)

श्रावणात कढीचे सेवन का करु नये, जाणून घ्या त्यामागचे लपलेले कारण

Shravan 2024: श्रावण महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. या काळात जलाभिषेक, रुद्राभिषेक इत्यादी अनेक प्रकारची क्रिया केली जाते, ज्यामुळे शिवाचा आशीर्वाद मिळू शकतो.
 
श्रावणात आपल्या आहाराची काळजी घ्या
श्रावर महिन्याच्या संदर्भात काही विशेष नियम देखील सांगितले आहेत. पुराणात या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत या काळात काय खावे आणि काय खाऊ नये हेही समजावून सांगितले आहे. श्रावण महिन्यात कढी खाण्यास मनाई आहे. असे का ते जाणून घेऊया-
 
श्रावणात कढीचे सेवन का करु नये?
श्रावणात कढी बनवली जात नाही कारण या महिन्यात महादेवाला दूध आणि दही अर्पण केले जाते. अशात कच्चे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे. यामुळेच श्रावणात दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तू खाण्यास मनाई आहे. शिवाय त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
 
कढी न खाण्याचे शास्त्रीय कारण
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, श्रावण महिन्यात कढीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा अनेक प्रकारच्या भाज्या देखील आहेत ज्या या काळात न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अशा भाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील पित्त वाढविणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढते. 
पावसामुळे हिरव्या व पालेभाज्यांवर किडे येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आरोग्य बिघडू शकते.
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
 
अस्वीकारण: येथे सादर केलेला मजकूर आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.