शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: बीजिंग , मंगळवार, 17 जून 2014 (15:18 IST)

'फिफा'चे सामने पाहताना तिघांचा मृत्यु

ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सामने पाहताना चीनमधील वेगवेगळ्या भागातील  तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाघांयमध्ये 36 वर्षीय एका फुटबॉल चाहत्याचा मृत्यु झाला आहे. सलग  तीन दिवस हा चाहत्या फुटबॉलचे सामने पाहात होता, असे वृत्त 'ईस्टर्न डेली'ने प्रसिद्ध केले आहे. 

तसेच सुझाऊ शहरामध्ये एक 25 वर्षीय तरुणाचा मृतहे त्यांच्या घरात आढळून आला आहे. कॉम्प्युटरवर हा तरुण  चिली-ऑस्ट्रेलिया संघामधील फुटबॉल सामना पाहात होता. दुसरीकडे 51 वर्षीय ली मिंगकियांग या व्यक्तीचा मृत्यु स्पेन  व नेदरलँड संघामधील लढत पाहताना झाला. ह्रदयविकाराचा झटका आल्याने ली मिंगकियांग यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय  सूत्रांनी सांगितले.