शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (18:29 IST)

Asian Games 2023 : पारुलने महिलांच्या 5000 मी. शर्यतीत इतिहास रचून सुवर्णपदक जिंकले

parul Chaudhary
Asian Games 2023 :  भारताची स्टार अॅथलीट पारुल चौधरी हिने इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. 25 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं. भारताची एकूण पदकसंख्या 64 वर पोहोचली आहे. 
 
भारताचे हे 14 वे सुवर्ण आहे. पारुल शर्यतीत मागे पडली होती, पण शेवटच्या काही सेकंदात तिने अप्रतिम पुनरागमन करत विक्रम रचला. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय खेळाडू अंकिता सहाव्या स्थानी राहिली.भारताच्या स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या पारुल चौधरीने चीनमध्ये इतिहास रचला आहे. तिने आशियाई क्रीडा 2023 च्या महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव केला आहे. पारुलने शेवटच्या 30 सेकंदात पुनरागमन करत विक्रम रचला.
 
पारुल ला 5000 मीटर शर्यतीत फायनल मध्ये 15:14:75 मिनिटे लागली. सुरुवातीच्या 4000 मीटरपर्यंत पारुल पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर होती. तिने शेवटच्या हजार मीटर्समध्ये पहिल्या तीन आणि शेवटच्या 200 मीटरमध्ये पहिल्या दोन स्थानी पोहोचले. जपानची रिरिका हिरोनाका तिच्या पुढे होती. शेवटच्या 30 मीटरमध्ये पारुलने अप्रतिम धाडस दाखवत जपानच्या रिरिकाला मागे टाकले. जपानच्या रिरिकाने 15:15.34 मिनिटे वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. कझाकस्तानच्या चेपकोचने 15:23.12 मिनिटांच्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. 
 
 





Edited by - Priya Dixit