दीपा कर्माकर दुखापतीने त्रस्त
भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर गुडघ्याच्या दुखापतीमधून अद्यापही सावरली नसून ती आगामी जागतिक स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती गुडघ्याच्या एसीएल दुखापतीमुळे त्रस्त असून ती याचवर्षी आशियाई स्पर्धेला मुकली होती. तिचा गुडघा नजिकच्या काळात किमान सहा महिने दुरुस्त होण्याची शक्यता नसल्याने ऑक्टोबरमध्ये होणार्या जागतिक स्पर्धेत खेळण्याची तिची शक्यता धुसर झाली आहे.