शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (07:08 IST)

Fastest Badminton Shot: सात्विकने 565 किमी प्रतितास वेगवान शॉट करून जागतिक विक्रम केला

Twitter
भारताचा स्टार खेळाडू सात्विकसाईराज रँकीरेड्डी याने बॅडमिंटनमधील पुरुष खेळाडूने 565 किमी प्रतितास वेगाने स्मॅश मारून सर्वात वेगवान 'हिट' करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. नुकतेच चिराग शेट्टीसह इंडोनेशिया ओपन सुपर 1000 चे विजेतेपद पटकावणाऱ्या सात्विकने मे 2013 मध्ये मलेशियाच्या टॅन बून ह्योंगचा 493 किमी प्रतितास वेगाचा दशकाहून अधिक जुना विक्रम मोडला.
 
सात्विकचा स्मॅश एखाद्या फॉर्मुला वन कार च्या  372.6 किमी प्रति तास च्या वेगाहून देखील अधिक वेगवान होता महिला विभागात सर्वात वेगवान बॅडमिंटन 'हिट' करण्याचा विक्रम मलेशियाच्या टॅन पर्लीच्या नावावर आहे, ज्याने 438 किमी प्रतितास वेगाने शॉट मारला.
 
जपानची खेळ उपकरण निर्माती कंपनी योनेक्स म्हणाली , योनेक्सला जाहीर करताना अभिमान वाटतो की योनेक्स बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (भारत) आणि टेन पर्ली (मलेशिया) यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान हिटसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. 14 एप्रिल 2023 रोजी जागतिक विक्रम स्थापित करण्यात आला आणि त्या दिवसाच्या गती मापन परिणामांवर आधारित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत न्यायाधीशांनी पुष्टी केली
 
मलेशियाच्या टॅन बून हेओंगने मे 2013 मध्ये सर्वात वेगवान स्मॅशचा विक्रम केला होता. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी हा विक्रम कायम राखला. आता सात्विकने ते आपल्या नावावर घेतले आहे.



Edited by - Priya Dixit