शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बर्लिन , गुरूवार, 12 जानेवारी 2017 (11:55 IST)

शरापोव्हाचे पुनरागमन लवकरच!

पाचवेळा  ग्रॅडस्लॅम अजिंक्यपद मिळविणारी रशियाची महिला टेनिसपटू मारिया शरापोव्हाचे 15 गेल्यावक महिन्यांच्या कालावधीनंतर लवकरच टेनिस क्षेत्रात पुनरागमन होणार आहे.  सध्या फ्लोरिडात वास्तव्य असलेल्या शरापोव्हावर गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ग्रॅड स्लॅम स्पर्धेवेळी उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने 15 म‍हिन्यांची बंदी घालण्यात आली होती. सुरुवातीला शरापोव्हावर दोन वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तिने या निर्णयाविरुद्ध दाद मागितली आणि तिचा बंदीचा कालावधी 15 महिने करण्यात आला. येत्या मे मध्ये होणार्‍या फ्रेंच ग्रॅड स्लॅम  स्पर्धेत शरापोव्हाचे पुन्हा टेनिस कोर्टवर दर्शन अपेक्षित आहे.