Wimbledon 2022: नोव्हाक जोकोविच आठव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत , रॉजर फेडररचा मोठा विक्रम मोडला
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या कॅमेरून नोरीचा पराभव केला. गतवर्षीचा उपविजेता आणि सहा वेळा विम्बल्डन चॅम्पियन जोकोविचने आठव्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याने कॅमेरून नोरीचा 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा चार सेटपर्यंतच्या लढतीत पराभव केला. या विजयासह जोकोविचने महान स्विस टेनिसपटू रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला.
जोकोविच ओपन एरामध्ये (1968 पासून) 32व्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पुरुष एकेरी स्पर्धेत तो सर्वाधिक फायनल खेळण्याच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. जोकोविचने फेडररला मागे टाकले. फेडररने 31 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रविवारी (10 जुलै) होणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविचचा सामना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसशी होणार आहे.